बाभळगाव मंडळासह सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा.

1 min read

बाभळगाव मंडळासह सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा.

शिवसेनेच्या वतीने निवेदनातून मागणी

सिध्देश्वर गिरी/परभणी: मागील अनेक दिवसांपासून पाथरी तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीकही गेले आहे. शेतकऱ्यांसमोर अनेक संकटाचा सामना करताना अनंत अडचणीला या सामोरे जावे लागत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी हवालदिल झाला असल्यामुळे आत्महत्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाथरी तालुक्यातील सर्व मंडळांसह बाभळगाव मंडळ अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने पाथरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,शेतकऱ्यांनी यावर्षी दुबार पेरणी तिबार पेरणी करत आपले पिक जोपासून मशागती केल्या मात्र पीक काढणीवेळीच परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अवसानाचा घात केला. या सर्व बाबीची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेणे गरजेचे असतांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रती अविश्वास दाखवत बाभळगाव मंडळ या अतिवृष्टी नोंदीतून वगळले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून समावेश करण्याची मागणी करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे,तालुकाप्रमुख मुंजा कोल्हे,उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड,हरिभाऊ वाकणकर,रामचंद्र आम्ले शाखाप्रमुख माणिक आरबाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.