देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ४४३ जणांचा मृत्यू

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ४४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावत घट होताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात १४ हजार ३०६ नव्या कोरोनाबंधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४४३ कोरोनाग्रस्तांना जीव गमावला आहे. देशात गेल्या २४ तासात १८ हजार ७६२ जणांनी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

देशात आतापर्यतची कोरोनाची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ४१ लाख ८९ हजार ७७४ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख ६७ हजार 367 रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ५४ हजार ७१२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. १ लाख ६७ हजार ६९५ इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १०२ कोटी २७ लाख १२ हजार ८९५ च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.