कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट - सांध्वी प्रज्ञासिंह

1 min read

कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट - सांध्वी प्रज्ञासिंह

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी भाजपच्या एका महिला उमेदवाराबद्दल आयटम हा आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता.

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर तोफ डागली. सोबतच कुटुंब नियोजनाबाबत जनतेला एक सल्लाही देऊन टाकला. कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचे सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्लाच अप्रत्यक्षपणे सांध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला आहे.

विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी कुटु्ंब नियोजनामुळे हिंदुंची संख्या घटत असल्याचे म्हटलं. हिंदुंनी आपल्या मुलांचे संरक्षण करावे. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणे शिकले पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा. आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा”, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी हिंदुंना दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.


मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी भाजपच्या एका महिला उमेदवाराबद्दल आयटम हा आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरुनही प्रज्ञासिंह यांनी कलमनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारतीय असाल तर महिलांचा सन्मान करणं शिका, नाहीतर रावणाच्या पुतळ्याप्रमाणे तुमचीही अवस्था होईल, अशा इशाराच प्रज्ञासिंह यांनी कमलनाथ यांना दिला. आपली आई, बायको, बहिण यांनाही याच नावाने आवाज देतात का? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी कमलनाथांना केलाय.

“भोपाळची जनता धर्म आणि अधर्मात भेद करणं जाणते. लोकसभा निवडणूक ही धर्म आणि अधर्म अशीच लढली गेली आणि भोपाळच्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की अधर्मावर नेहमी धर्माचाच विजय होत असतो”, अशा शब्दात प्रज्ञासिंह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या आम्ही तिरंगा उचलणार नाही या विधानावरही जोरदार हल्ला चढवला. “अब देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, अशा इशाराच त्यांनी मुफ्ती यांना दिला आहे.