अक्का फाँडेशनच्या वतीने १० आॕक्सिजन काँन्सेट्रेटर चे लोकार्पण

निलंग्यात आॕक्सिजन बँक आपल्या दारी

अक्का फाँडेशनच्या वतीने १० आॕक्सिजन काँन्सेट्रेटर चे लोकार्पण

माधव पिटले/निलंगा: केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निलंगा येथे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते अक्का फाँडेशनच्या वतीने १० आॕक्सिजन काँन्सेट्रेटर लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता एका फोनवर आॕक्सिजन मशीन रूग्णांना मिळणार आहे.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून संभाव्य तिस-या लाटेची तयारी केली जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून अतिदक्षता विभागाचे लोकर्पण करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण दगावले असून आॕक्सिजन मिळत नसल्यामुळे प्रशासनाला आॕक्सिजन मिळवण्यासाठी प्लान्टवर २४ तास तळ ठोकून बसावे लागले. संभाव्य तिसरी लाट ही लहान बालका मध्ये निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. शिवाय आॕक्सिजन अभावी रूग्णांचा मृत्यू होऊ नये म्हणून आक्सिजन प्रकल्प निर्मितीवर सर्वजन भार देत आहेत.

केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा देवणी शिरूरअनंतपाळ या तीन तालुक्यासाठी आठ तर लातूर येथे दोन अशा एकून दहा आॕक्सिजन काँन्सेट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, चेअरमन दगडू सोळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गणेश जाधव, वैद्यकीय अधिक्षक प्रल्हाद सोळुंके, डॉ ज्ञानेश्वर कदम, डॉ लालासाहेब देशमुख, भाग्यश्री काळे अदी उपस्थित होते.

त्यानंतर माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी उपजिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता  विभागाची व शंभर खाटाच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची  पहाणी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह  केली. दरम्यान संभाव्य कोरोना संसर्ग लाटेत कमतरता पडू नये म्हणून आॕक्सिजन प्रकल्पासाठीच्या जागेची पहाणी करून तत्काळ हा आॕक्सिजन प्लांट मार्गी लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.