१२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण, निलंगेकर यांचा उपक्रम

खा. सुधाकर शृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रूग्णवाहिकांचे केले उदघाटन

१२ रूग्णवाहिकांचे  लोकार्पण,  निलंगेकर यांचा उपक्रम

निलंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवस अन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निलंग्याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दोन्हीचे औचित्य साधून निलंग्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा.सुधाकर शृंगारे यांच्या स्थानिक विकास निधीतून निलंगा तालुक्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता गावखेड्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.राज्यात बारामती हा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका असलेला पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला असून त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ हा निलंगा ठरलाय जिथं सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका उपलब्धता झाली आहे. कोरोना असो की संकट काळ या रूग्णवाहिकांचा फायदा सामान्य जनतेला होणार आहे.असा विश्वास आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.हा लोकार्पण सोहळा निलंगा पंचायत समितीच्या आवारात पार पडला यावेळी दोन दिव्यांग व्यक्तींना चार्चिंग सायकलही देण्यात आल्या.

या लोकार्पण सोहळ्याला जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके,कृषी सभापती गोविंद चिलकुरे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळे,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,तहसिलदार गणेश जाधव ,गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,निलंगा उपजिल्हा रूग्णालयाचे अदिक्षक दिलीप सौंदळे,तालुका आरोग्य अधिकारी प्रदिप जाधव ,जि.प.सदस्य संतोष वाघमारे ,संजय दोरवे,न.प.सभापती इरफान सय्यद,प.स.सभापती राधा बिराजदार,उपसभापती अंजली पाटील,प.स.गोकर्णा पाटील,हरीभाऊ काळे,कालीदास पाटील,उर्मिला जाधव,रमेश जाधव,अजित माने,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.