दिल्ली: क्रिकेटपटूच कोरोनामुळे निधन

1 min read

दिल्ली: क्रिकेटपटूच कोरोनामुळे निधन

दिल्लीचे माजी क्रिकेटपटू संजय डोभाल यांच कोरोनामुळे निधन

दिल्ली: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रख्यात क्लब क्रिकेटर आणि दिल्ली अंडर -23 संघाचे माजी सहाय्यक कर्मचारी संजय डोभाल यांच कोरोनामुळे निधन झाले आहे. कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली. डोभाल 53 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सोमवारी सकाळी संजय डोभाल यांचे निधन झाले..

डीडीसीएच्या एका अधिका-याने सांगितले की, 'डोभाल यांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे होती आणि प्रथम त्यांना बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली परिस्थिती बिकट झाल्यावर त्यांना द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
फिरोजशाह कोटला मैदानाचा एक ओळखीचा चेहरा असलेले डोभाल हे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मनहास यांच्यात खूप लोकप्रिय होते.