दिल्लीच्या जामा मशिदीत नियमांचे उल्लंघन

1 min read

दिल्लीच्या जामा मशिदीत नियमांचे उल्लंघन

मशिद प्रशासनाने नागरिकांना सतत आवाहन करुन देखील नियमांच पालन झाल नाही.

स्वप्नील कुमावत: कोरोना संकटामध्ये दिल्लीतील जामा मशिदीत शनिवारी सकाळी 5:00 वाजता ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद ची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीत तैनात असलेल्या पोलिस कर्मचा-यांनी थर्मल स्क्रीनिंग केल्यानंतरच लोकांना मशिदीत प्रवेश दिला. कोरोना संकटामध्ये काही नामाजी सामाजिक अंतर पाळताना दिसले, तर काही त्याचे उल्लंघन करताना दिसले. मशिदीसमोर बसलेले लोक काही अंतर ठेवून प्रार्थना करीत होते. पण मागे बसलेले लोक अगदी जवळ बसून नमाज पाठताना दिसले. बरेच मुस्लीम बांधव मशिदीमध्ये विनामॉस्क प्रार्थना करत होते.
कोरोनाच्या संकटात दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये नमाच पठण करताना सुरक्षित अंतर पाळल्या गेलं नाही. तर काहीच्या तोंडाला मॉस्क देखील दिसले नाही. मशिद प्रशासनाने नागरिकांना सतत आवाहन करुन देखील नियमांच पालन झाल नाही.