दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह.

1 min read

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह.

कोरोना सदृश लक्षणे आढळल्यामुळे स्वतःला घेतलं होत आयसोलेट करून.

नवी दिल्ली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काल अचानक तब्येत बिघडली, त्यांना (दि. 7)  रोजी  सर्दी, ताप, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली होती. त्यांनी आपल्या सर्व बैठका रद्द करून स्वतःला आयसोलेट करून घेतलं होत. आज त्यांची कोविड19 चाचणी करण्यात आली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा देणारी बातमी आहे.तर एकीकडे दिल्ली कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे आतापर्यंत 29943 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, 11357 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 17712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 874 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.