शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी.

1 min read

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी.

युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

सिध्देश्वर गिरी/परभणी: सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाचा फटका बसला असून. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.यात दुबार पेरणी तिबार पेरणी करूनही बी-बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा मावेजा दिलेला नाही. या संकटावर मात करत असतानाच मूग या पिकाच्या काढणीवेळी झालेल्या पावसामुळे नुकसान सहन करावे लागल्याचा प्रकार झालेला आहे.या सर्व संकटावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाने आर्थिक नुकसान सहन करत सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.यामुळे सध्या स्थितीत या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असून सदर आर्थिक मदत ही शेतकऱ्यासाठी दिलासादायक ठरणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.