संचारबंदी हटविण्याची मागणी

मंडप, डेकोरेटर्स, साऊंड ओनर्स असोशिएशनकडून निदर्शने

संचारबंदी हटविण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील मंडप, लायटिंग, डेकोरेटर्स व साऊंड सर्व्हिस देणार्‍यानी टाळेबंदीचा निषेध करीत आज निर्बंध हटविण्याची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर नॅशनल मंडप, लायटिंग व डेकोरेटर्स, साऊंड ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून बुधवारी निदर्शने करण्यात आली.याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना जिल्हाधिकार्‍यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनावर स. गफार स. चांद, शंकरराव तोडकर, गोविंद अग्रवाल, कॉम्रेड राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. शासनाच्या तर्क विसंगत कार्यपध्दती व जुनाट कायद्याच्या आधारे प्रशासनाच्या दंडेलशाहीविरूध्द २४ मार्च हा दिवस काळा दिवस पाळत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मंडप, लायटिंग, डेकोरेटर्स व साऊंड सर्व्हिस या व्यवसायांवर पाच हजाराहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील वर्षी २४ मार्च २०२० पासून आजपर्यंतच्या संपूर्ण वर्षभरात व्यवसाय करता आलेला नाही. मध्यंतरी घेण्यात आलेल्या अनलॉकमध्ये राज्य शासनाने सिनेमा, नाट्यगृह, मॉलसारख्या आस्थापनांना परवानगी दिली. ५५ आसन क्षमता असलेल्या बसेसलाही परवानगी बहाल करण्यात आली. परंतु जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत जाचक व विसंगत अशा प्रकारचे निर्बंध या व्यवसायावर लादण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. लसीकरण प्रक्रियेची गती वाढलेली असताना निदान या व्यवसायावरील निर्बंध अन्य व्यवसायांइतकेच शिथील करावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.