कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी

शहरातील विकास कामे थांबल्याने करण्यात आली मागणी...

कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी

परभणी : सेलू नगर परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील विकास कामांना खिळ बसली असुन, नगरपरिषदे मध्ये सर्वच बाबींचा खेळखंडोबा होत आहे. परिणामी जनतेची आवश्यक कामे होत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन सेलू नगर परिषदेमध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी नगरसेवक शेख रहीम शेख गुलाम, नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब, नगरसेविका नाहीदा तब्बसुम अजिम कादरी, नगरसेवक शेख कासिम शेख अय्युब, समाजिक कार्यकर्ते अय्युब अमिनोद्दिन, सामाजिक कार्यकर्ते अजिम कादरी यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सेलू नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन जयवंत सोववणे यांना ऑगस्ट-२०२० पासून प्रभार सोपवण्यात आला, परंतू ते नगर परिषद सेलू मध्ये येतच नाही. न.प. च्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करत नाही. बैठक अयोजित केली तरी प्रभारी मुख्याधिकारी बैठकीस उपस्थित राहत नाही. महत्वाच्या अर्थसंकल्पिय बैठकीसही ते उपस्थित नव्हते. प्रभारी मुख्याधिकारी न.प. कार्यालयात कधीच उपस्थित राहत नसल्यामुळे नागरीकांचे बांधकाम परवानगी, नामांतर सारखे कामे मुळीच होत नाहीत. इतर कामांनाही नागरीकांनी स्वत:चे कामे बुडवून आठ-आठ दिवस चकरा माराव्या लागत आहे. तरी त्यांचे कामे होत नाहीत. कार्यालयात कर्मचारी मार्च एंडच्या नावाखाली भेटतच नाही, भेटले तरी सहीचे अधिकारच नाही म्हणुन टोलवा टोलवी करत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करावे अन्यथा न.प. ला कुलूप लावणे, धरणे आंदोलन, रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वत: शासनाशी पत्रव्यहार करुन लवकरात लवकर कायम स्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त केल्या जाईल, असे तोंडी आश्वासन दिल्याची माहीती निवेदनकर्त्यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.