नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांच नाव देण्याची मागणी

वसंत विचारधारा मंच उभारणार लढा!

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांच नाव देण्याची मागणी

सोनपेठ : नवी मुंबई विमानतळास शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी वसंत विचारधारा मंचच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कर्तृत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे.महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करीत असतांना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची उभारणी करत योगदान दिले आहे. तत्कालीन विरोधी पक्षानी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शवीला होता,परंतु दूरदृष्टी असणारे'विकासाचे महानायक' तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई उभारली,हे देशभर सर्वश्रुत असतांना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देणे अतिशय समर्पक आणि उचित ठरेल.आधुनिक महाराष्ट्राला घडविणार्‍या नाईक यांच्या सन्मानार्थ भरिव आणि ऐतिहासिक असे आजवर काहीही दिसून आलेले नाही हे दुर्देवी आहे.वसंतराव नाईक जन्मशताब्दीवर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबीत आहेत.हे अतिशय खेदाने म्हणता येईल.नाईक यांच्या अनुयायात,ओबीसी मागासवर्गीय,बंजारा समाजात याविषयी प्रचंड अस्वस्थता आहे.

१ जुलै कृषीदिन (वसंतराव नाईक जयंती) या पावनपर्वावर नाईक यांच्या नावाने विशेष घोषणा व निर्णय होतील,यासाठी तत्काळ नवी मुंबई विमानतळाला "वसंतरावजी नाईक नवी मुंबई विमानतळ"असे नामकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर राजेश चव्हाण,पत्रकार दुर्गादास राठोड,सिद्धेश्वर गिरी,मारोती पवार,अंकुश पवार,यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.तसेच वसंत विचारधारा मंच हा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर निर्णय घेणार असल्याचे राजेश चव्हाण यांनी कळवले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.