महसूलमंत्री थोरात यांच्या मुलींच्या नावाने बनावट फेसबुक अकांऊट काढून केली पैशांची मागणी

राज्याचे महसूलमंत्री व कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून अनेकांना ऑनलाईन पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.संगमनेर पोलिसात तक्रार दाखल

महसूलमंत्री थोरात यांच्या मुलींच्या नावाने बनावट फेसबुक अकांऊट काढून केली पैशांची मागणी

शिर्डी: राज्याचे महसूलमंत्री व कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून अनेकांना ऑनलाईन पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.(Demanded money by removing fake Facebook account in the name of Revenue Minister Thorat's daughters)
या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सिध्दार्थ सुभाष थोरात यांनी तक्रार दिली आहे. असे बनावट फेसबुक अकाऊंट काढणा-यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सिध्दार्थ थोरात यांनी दिलेल्या अर्जात केली आहे.

डॉ.जयश्री थोरात यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक खाते तयार केले. याच बनावट खात्यावर डॉ. जयश्री यांचा फोटो वापरला आहे. 1 व 2 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास याच बनावट खात्याद्वारे ऑनलाईन फोन पे, गुगल पे वरून पैसे पाठविण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला. यानंतर सिध्दा४त थोरात यांनी संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला. कोणातरी असे फेक अकांऊट तयार करून पैसे उकळण्याचे काम करीत आहे. हे बनावट अकाऊंट त्वरीत बंद करण्याची मागणी थोरात यांनी दिलेल्या अर्जात केली आहे. तात्काळ या अर्जाची दखल घेत हे बनावट अकाऊंट बंद करण्यात आलं आहे व पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री थोरात

या सर्व प्रकारावर स्वत: डॉ.जयश्री शोरात यांन फेसबुक पोस्ट केली आहे त्यात, ‘हे माझे अधिकृत फेसबुक अकाऊंट आहे. इतर कोणत्याही अकाऊंटशी माझा संबंध नाही. तरी एकविरा फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमाबद्द्लची माहिती मी या फेसबुक अकाऊंट वरीन आपल्यापर्यत पोहचवीत राहील. तरी इतर माझ्या फेक अकाऊंटची पोलीस खात्याकडे तक्रार दाखल केली आहे.’ अशी पोस्ट डॉ जयश्री थोरात यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.