आयकर अधिकारी असल्याचं सांगत मागितली ६० लाखांची खंडणी; बिल्डरकडून तक्रार दाखल

बिल्डरची पोलीस आयुक्तालयात धाव, संशयित पोलीसांच्या ताब्यात

आयकर अधिकारी असल्याचं सांगत मागितली ६० लाखांची खंडणी; बिल्डरकडून तक्रार दाखल

औरंगाबाद : शहरातील जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बिल्डरला आपण आयकर अधिकारी असल्याचं सांगत तुमच्या ओळखीच्या कोणीतरी १०० कोटींचा व्यवहार केला आहे, आणि त्याचा कर बुडवला असे सांगत ६० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. सुशांत गिरी(वय.३८,रा.शिवशंकर कॉलनी) असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे.

खंडणी मागायला आलेल्या दोघांपैकी एकजण आयकर अधिकारी आणि दुसरा सहाय्यक असल्याचे सांगत बिल्डरकडे खंडणीची मागणी केली. बिल्डरला संशय आल्याने त्यांनी या संबंधीची रेकॉर्डिंग केली. आणि पोलीस आयुक्तालय गाठत या संबंधीची तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास करीत जवाहर नगर पोलिसानी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी ३ संशयितांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी एक हॉटेल व्यावसायिक दुसरा ब्रोकर तर तिसरा एलआयसी एजंट असल्याचं सामोर आलं आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस चौकशी करत असून चौकशी नंतर गुन्हा दाखल केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
gffghfh-8


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.