देशात 9996 नवीन कोरोनाग्रस्त

1 min read

देशात 9996 नवीन कोरोनाग्रस्त

बुधवारी 357 रुग्णांचा मृत्यू , देशाचा मृत्यूदर 2.83 टक्के

स्वप्नील कुमावत/दिल्लीः देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दि 11 जून रोजी देशात 9 हजार 996 नविन रुग्ण आढळले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 86 हजार 479 वर गेली आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर 2.83 टक्के आहे. सर्वाधिक 94 हजार 041 कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.33 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर देशाचा कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये 24 तासात 149 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.