देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक

1 min read

देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक

देशात 1 लाख 35 हजार 205 रुग्ण कोरोनामुक्त

स्वप्नील कुमावत/दिल्लीः देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्याहून अधिक असल्याचे दिसून आले. देशभरात आता पर्यंत 1 लाख 35 हजार 205 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 1 लाख 33 हजार 632 रुग्ण सध्या उपचार घेत आहे. आता पर्यत 2 लाख 76 हजार 583 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना महामारीमध्ये 7 हजार 745 रुग्णांला आपला जीव गमवावा लागला.

देशात सलग सहाव्या दिवशी 9500 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण
आज म्हणजे बुधवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या जवळपास 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सहाव्या दिवशी देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9500 हून अधिकने वाढत आहे. गेल्या 24 तासात एकूण 279 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश
• अमेरिकाः एकूण रुग्ण 20 लाख 45 हजार 549, एकूण मृत्यू 1लाख 14 हजार 148
• ब्राझीलः एकूण रुग्ण 7 लाख 42 हजार 084, एकूण मृत्यू 38 हजार 497
• रुसः एकूण रुग्ण 4 लाख 85 हजार 253, एकूण मृत्यू 6 हजार 142
• यूकेः एकूण रुग्ण 4 लाख 85 हजार 253, एकूण मृत्यू 40 हजार 883
• स्पेनः एकूण रुग्ण 2 लाख 89 हजार 046, एकूण मृत्यू 27 हजार 136
• भारतः एकूण रुग्ण 2 लाख 76 हजार 146, एकूण मृत्यू 7 हजार 750
• इटलीः एकूण रुग्ण 2 लाख 35 हजार 561, एकूण मृत्यू 34 हजार 043
• पेरुः एकूण रुग्ण 2 लाख 03 हजार 736, एकूण मृत्यू 5 हजार 738
• जर्मनीः एकूण रुग्ण 1 लाख 86 हजार 516, एकूण मृत्यू 8 हजार 831
• इराणः एकूण रुग्ण 1 लाख 75 हजार 927, एकूण मृत्यू 8 हजार 425