देव, देवदूत आणि व्यसन

आजकाल राजकारणात देवदुतांची संख्या वाढू लाागली आहे. फुकट मिळावे ही माणसिकता आणि सरकारी मदत देणारा देवदूत अशी नवी व्याख्या निर्माण झाली आहे. अशा राजकीय देवदुतापासून राजकारणातील तथाकथीत देवांनाच फटका बसण्याची दाट शक्यता असते.

देव, देवदूत आणि व्यसन

आजकाल देवदूत किंवा देवत्व बहाल करण्याची स्पर्धाच लागली आहे. उठसुठ कोणीही कोणाला देवदूत असल्याचे जाहीर करतो आहे.
बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला हे बालगीत आपण ऐकलेच असेल. बैल मोठा दिसतो म्हणून बेडकी बैलाईतके दिसण्याचा प्रयत्न करू लाागली तर श्फोट होऊन मरण्याचा धोका असतो हे तथाकथीत कुपमंडूक देवदुतांना लक्षातच येत नाही.
फुकट मिळावे ही स्वाभाविक भावना आणि जो फुकट देतो तो देव किंवा देवदूत असे संबोधले जाते. किमान तसा मोठेपणा देऊन आपला स्वार्थ साधून घेतला जात आहे.
हे देव होणे किंवा देवदूत होणे एका नशेसारखे झाले आहे. देवत्व बहाल करणारे लाभ म्हणून बहाल करतात आणि ज्यांना बहाल केले जाते त्यांना याची सवय लागली आहे. आताशा काही लोकांना आपल्या नावाच्या आधी देवदूत असे शब्द लावून घेण्याचे व्यसनच लागले आहे.

एखादा व्यक्ती स्वकमाईतून मदत करत असेल तर एकवेळ समजू शकतो, आणि आपल्या घासातील घास गरजुला जो देतो तो खरेच पुण्याचे काम करत असतो.
पण सरकारी मदत लोकांना बहाल करत देवदूत होण्याची सवय मात्र भयंकरच म्हणावी लागेल.
सरकारी यंत्रणा वेगवेगळ्या स्वरूपात लोकांना मदत करत असतात. कल्याणकारी राज्याची कल्पनाच आहे ती. मदत देण्यासाठी सरकार काही अधिकारी नियुक्त करत असते. पैसा सरकारी असतो अथवा कंपन्यांच्या सीएसआर फ़ंडातून सरकारला दिलेल्या निधीतून मिळत असतो. पण हीच अधिकारी अथवा जबाबदारी दिलेली मंडळी सरकारी म्हणजे जनतेचा पैसा जनतेतील काही गरजवंत मंडळीला देऊन स्वतःचा असल्यासारखे भासवत असतात. आणि सरकार किंवा सरकारच्या प्रमुख यांची प्रतिमा मोठी करण्याऐवजी स्वतःची प्रतिमा उजळून घेत राहतात.
मी केले, मी दिले ही भावना सतत दिसत राहते.
मुळात कोणती कंपनी अथवा दानशूर व्यक्ती ही व्यवस्थेला पैसा देत असते, ती सरकार आणि सरकारच्या प्रमुखाच्या प्रभाव असल्याने. पण अशी काही व्यक्ती जे या यंत्रणेवर प्रमुख म्हणून नेमलेली असतात ती काही लाभार्थी मंडळींनी देवदूत म्हटल्याने स्वतःचा प्रभाव समजत त्याचे सर्व श्रेय ही व्यवस्था अस्तित्वात आणणाऱ्या ऐवजी स्वतःकडे घेत असतात. आपल्या प्रमुखाच्यापेक्षा देखील स्वतःची प्रतिमा अधिक मोठी करून घेत राहतात.
खरे तर असे मोठे म्हणवून घेण्याचे व्यसनच या व्यक्तींना लागलेले असते. आणि त्याच नशेत ही मंडळी वावरत असतात.
अशा प्रकारांनी ते आपल्या प्रमुखाची प्रतिमा खराब करत असतात याचे भान देखील या मंडळींना राहत नाही. खरे तर हा पैसा म्हणजे सरकारी निधी असतो म्हणजे पर्यायाने जनतेचा पैसा असतो. जनतेचा पैसा जनतेला देऊन त्यावर देवत्व प्राप्त करून घेणे हा प्रकार म्हणजे निव्वळ पोरकटपणा असतो.

देवदूत क्रमांक दोन

देवदूताचे काही रंजक प्रकार अजून बघायला मिळतील. एखादया नेत्याचे समर्थक नेत्याच्या कृपाशीर्वादाने चांगली कमाई करतात. आणि चार दोन उत्साही कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचे कार्यकर्ते म्हणून नेमतात. चार दोन हजार रुपये आणि एक स्मार्ट फोन घेऊन देतात आपल्या गाडीत फिरवतात. आणि त्यांचे देवदूत बनून जातात. मग हेच देवदूत हळूहळू आपला देव विसरून आपणच देव बनतात. सोशल मीडिया किंवा मीडियातील आपल्या पाळीव लोकांना आपले दूत बनवून टाकतात. मग हे तथाकथित देव किंवा देवदूत आपल्याच नेत्याला ब्लॅकमेल करू लागतात.
असे देवदूत आता पावलोपावली सापडू लागले आहेत. ही अशी देवदूत नेतेमंडळीची काही काळासाठी डोकेदुखी देखील ठरतात. अन्य लोकांना त्रास देण्यासाठी तयार केलेला देवदूत मग देवदूत होण्याच्या व्यसनापायी आपल्याच देवाला बदनाम करू लागतो. किंवा देवाच्या बदनामीचे कारण ठरू लागतो.

मेरे शहर में हैं ख़ुदा बहोत,
मगर आदमी का पता नहीं

एकदा भगवान शंकराने प्रसन्न होऊन एका दैत्याला आशीर्वाद दिला... तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. झाले हा दैत्य पुढे भस्मासुर बनला. ज्याला त्याला डोक्यावर हात ठेवून भस्मसात करू लागला. त्याला आपल्या शक्तीचा अहंकार झाला आणि लोकांना भस्मसात करण्याचे व्यसन त्याला लागले. कोण जगावे की मरावे हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला मिळाला असा त्याचा समज झाला. आणि वाटेल ते करत सुटला. शेवटी तो शंकराला जाळायला निघाला. शंकर अडचणीत आले. आपलाच आशीर्वाद असा उलटेल असे त्यांना वाटलेच नसेल. मग भगवान विष्णुला मदतीला यावे लागले त्यांनी मोहिनी अवतार घेत या भस्मासुराचा त्याचाच हात त्याच्या डोक्यावर ठेवायला भाग पाडून अंत केला.
आताही राजकारणातील तथाकथित महादेवांनी आपणच निर्माण केलेले भस्मासुर असेच मोठेपणाच्या नशेत आपल्या देवाला संपुष्टात आणतील. कोणी मोहिनी या नशेखोरांना नियंत्रित करायला येणे आवश्यक आहे. पण आजकाल चे राजकीय महादेव भस्मासुर संपविण्याच्या ऐवजी रक्षक मोहिणीला संपवायला निघाली असतील तर महादेव को कौन बचायेगा?


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.