स्वप्नील कुमावत/मुंबई: मुंबईतील रुग्णालयांतून गेल्या काही दिवसांत कोरोनामुळं बळी गेलेल्या अर्धा डझन रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी सविस्तर ट्विट करुन गायब झालेल्या मृतदेहांची नावासह माहिती दिली आहे. हे मृतदेह कोणत्या रुग्णालयांतून गायब झाले याचीही माहिती त्यांनी दिली आहे. या तपशीलासह सोमय्या यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यांचे मृतदेह रुग्णालयातुन गायब झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या मनःस्थितीचा विचार करुन सरकारने करवाई करावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
गायब झालेल्या मृतदेहांची माहिती
- सुधाकर खाडे, केईएम हॉस्पिटल
- मेहराज शेख, राजवाडी हॉस्पिटल, घाटकोपर
- विठ्ठल रघुनाथ मोरे, शताब्दी हॉस्पिटलस कांदिवली
- मधुकर पवार, एनएससीआय वरळी/नायर हॉस्पिटल
- सायन हॉस्पिटलने ग्यांतीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह कुटुंबियांकडे देण्याच्या आधीच अंतिमसंस्कार केले
- राजेश शर्माचे नातेवाईक ट्रॉमा हॉस्पिटल, जोगेश्वरी
असा तपशिलासह पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री आनिल देशमुख यांना दिले आहे.
