धक्कादायक: एकाच कुटुंबातील चार जणांची गळफास घेऊन आत्महत्या

1 min read

धक्कादायक: एकाच कुटुंबातील चार जणांची गळफास घेऊन आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह संपवल जीवन

पुणे : एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार वाघजाई नगर इथे घडला. अतुल दत्तात्रय शिंदे आणि पत्नी जया अतुल शिंदे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण आर्थिक अडचण होती का? याचा तपास पुणे पोलिस करत आहे. दरम्यान या प्रकरणी घरामध्ये पोलिसांना सुसाईट नोट सापडली आहे.

सुसाईड नोट

पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत असं पेन्सिलिनं भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळावर सापडली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आर्थिक संकटामुळे या कुटुंबीयानं टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु तपासाअंती स्पष्ट होईल अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
मुळचे परभणीचे असणारे अतुल आणि जया यांचा 2013 रोजी प्रेम विवाह झाला होता. पुण्यातील वाघजाई नगर इथे दोघंही राहात होते. त्यांना दोन मुलं होती. या दाम्पत्यानं 6 वर्षीय श्रुग्वेद आणि 3 वर्षांच्या अंतरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.