वर्धाःसरकारी रुग्णालयात शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आलेल्या एका लहान चिमुकल्याच्या मृतदेहाचे उंदराने लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी 13 जून रोजी उघडकीस आला. डॉक्टराने शवविच्छेदन गृहातील मृतदेह बाहेर काढल्यावर निदर्शनांस आली घटना. रेणकापूर येथील प्रथम उर्फ गणेश राजू निखाते वय अडीच वर्ष हा चिमुकला खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला. त्याला वडिलांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषत केले. पण शवविच्छेदन झाल्यशिवाय मृतदेह मिळणार नाही असे सांगण्यात आले.
दुस-या दिवशी मृतदेहाचे उंदराने लचके तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. तेव्हा डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. नंतर तहसीलदार यांनी मृतकुटुंब आणि डॉक्टर यांच्यामध्ये मध्यस्थी केली आणि वाद मिटविला. यावर एक समिती नेमून दोषीवर करवाई करु असे आश्वसान तहसीलदार यांनी दिले.
धक्कादायक: मृतदेहाचे उंदराने लचके तोडले.
वर्धातील सरकारी रूग्णालयाचा भोंगळ कारभार,रुग्णालय परिसरात तणाव

Loading...