'धमाका'ची धम्माकेदार एंट्री....

१९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला.

'धमाका'ची धम्माकेदार एंट्री....

मुंबई- बहु चर्चित कार्तिक आर्यनच्या धमाका चित्रपटाचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले. जगातल्या प्रसिध्द प्लॅटफाॅर्मवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेल्या कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.कार्तिक पुन्हा एकदा आपल्या 'धमाका' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

कार्तिक आर्यन पत्रकार बनून डिजिटल स्पेसमध्ये ‘धमाका’ करणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमाका’ट्रेलर आज १९ ऑक्टोबर रिलीज झाला आहे,ज्यामध्ये कार्तिकच्या परिवर्तनाने चाहते थक्क झाले आहेत.मनोरंजक गोष्ट म्हणजे, कार्तिक बऱ्याच काळापासून रोमँटिक-कॉमेडी स्पेसवर राज्य करत असताना, ‘धमाका’त्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, ज्याने त्याच्या करिअरच्या आलेखात एक नवीन आयाम जोडला जाईल.हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १९ नोव्हेंबरला येणार आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या व्यक्तिरेखेत येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.धमाकामध्ये कार्तिक एका न्यूज अँकरची भूमिका साकारतो आहे,ज्याला त्याच्या रेडिओ शोवर एक भयानक कॉल येतो आणि करिअरमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळते.तथापि,यासाठी त्याला त्याच्या विवेकबुद्धीचा वापर करावा लागू शकतो.

या ट्रेलरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जिथे चाहते कार्तिकच्या अनुभवात्मक चित्रणाची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीयत.ट्रेलरमधील अभिनेत्याच्या लूकला खूप दाद मिळत आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या अभिनयालाही!


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.