धनेगांव येथे पाणीपुरवठा पाईप लाईनचे भूमीपुजन...

1 min read

धनेगांव येथे पाणीपुरवठा पाईप लाईनचे भूमीपुजन...

मा.आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या मार्गदर्शनात जि.प.सदस्य प्रशांत पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे व बाळासाहेब बिरादार यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या अंगणवाडी, जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण व नवीन पाईपलाईनचे भुमीपुजन यावेळी ही करण्यात आले.

देवणी : धनेगांव येथील  ग्राम पंचायतीला पाणी पुरवठा करणारी विहीर ही धनेगांव उच्चस्तरीय बंधार्‍यातील  पाण्यात बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे गावाला पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पं.स.सभापती सौ.चित्रकला बिरादार यांच्या निधीतुन सदरील पाईप लाईनचे काम करण्यात आले आहे. तसेच मा.आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या मार्गदर्शनात  जि.प.सदस्य प्रशांत पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे व बाळासाहेब बिरादार यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या अंगणवाडी,  जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण व नवीन पाईपलाईनचे भुमीपुजन यावेळी ही करण्यात आले.

भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे यांनी स्वर्गीय दिलीपभाऊ पाटील निलंगेकर यांच्या स्मरणार्थ धनेगांव येथील वडारवस्ती वरील अंगणवाडी मध्ये रंगरंगोटी  नव रूप दिलं आहे.  हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे.  या उपक्रमाचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहन  शिक्षक नेते तानाजी पाटील यांनी केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, तानाजी पाटील,  यांच्या हस्ते पाईप लाईनचे भुमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामसेवक श्रीकांत पताळे, भाजयुमो अध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, श्रीराम खारे , ज्ञानेश्वर बिरादार,  बालाजी बिरादार, मूरहारी बिरादार, लिंबराज बिरादार, प्रणव बिरादार, उमाकांत बिरादार, बालाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती.