सीएमओच्या ट्विटरवरुन 'उस्मानाबादच्या पुढे धाराशिव'

CMO ने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये काॅग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे.

सीएमओच्या ट्विटरवरुन 'उस्मानाबादच्या पुढे धाराशिव'

मुंबई : औरंगाबाद नामांतराचा विषय संपत नाही तोपर्यंत दुसर-या वादाला तोंड फुटताना दिसत आहे. मुख्यंमत्री कार्यालयाच्या (सीएमओ)अंकाऊटवरुन मंत्री मंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरुन वाद होण्याची शक्यता आहे. अलीकडेच का्ॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याच्या विषयावर आमचा विश्वास नाही,अशी भुमीका मांडली होती.

धाराशिव उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्र ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम १९९८ मध्ये सुधारणा. असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.