दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर.

1 min read

दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर.

शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा

प्रद्युम्न गिरीकर /प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक अडचणी निर्माण होत असताना दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज हिंगोलीमध्ये माहिती देताना सांगितले की 15 ते 20 जुलै पर्यंत इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल तर 30 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे इयत्ता दहावी बारावी सह अनेक शाखेचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांसमोर देखील चालू शैक्षणिक वर्षा संदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. निकाल केव्हा जाहीर होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना आज शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी याबाबत शासनाचे धोरण स्पष्ट करताना 20 जुलैपर्यंत बारावीचा निकाल तर 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगितले