मनसेच्या नेते पदी धोत्रे तर सरचिटणीस पदी संतोष नागरगोजे यांची निवड

मनसेच्या नेते पदी धोत्रे तर सरचिटणीस पदी संतोष नागरगोजे यांची निवड

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर मनसेने मोठे फेर बदल केले आहेत. मनसेच्या सरचिटणीस पदी संतोष नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यामान सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मनसेच्या नेते पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दोघांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दोघांना शुमेच्छा देत पत्रात म्हटंल की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी यामध्ये आपणांकडुन कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकार्याकडुन समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हिच अपेक्षा ! मराठी बांधवाना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आपणासं सरचिटणीस पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्या देतो !


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.