"राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?"

'संजय राऊतांनी कधीच कोणाची वकीलि करु नये, अजित पवारांची वकीली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला' - निलेश राणे

"राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?"

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधुन 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र चोरुन राज्यपालांना देणे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधुन भाजपवर निषाणा साधला होता. त्यावर आता भाजप नेते निलेश राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पवारांच्या ड्रॉवरमधुन आमदारांच्या सहीचे पत्र चोरताना अजित पवारांसोबत कोण होतं? असा सवाल शिवसेनेने विचारला होता. 'त्यावर संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?' अशी खोचक प्रतिक्रीया निलेश रांणेंनी दिली आहे." संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करु नये, अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं, पण टॉर्च मारला कोणी? मुळात अशा पद्धतीचा प्रश्न विचारुन संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?" असा सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.

54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारणं हे त्यांच्या अस्वस्थतेचे लक्षण आहे. पवारांनी पत्र चोरले हे जरी अनैतिक असले तरी भाजप नेत्यांनी त्याचा स्वीकार करणे, त्यावर विश्वास ठेवुन ते राज्यपालांकडे सुपुर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात शपथ घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे, हे केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीरही ठरते अशी टीका शिवसेनेने केली होती.  


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.