दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन

मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन

मुंबईः दिग्दर्शक राज कौशल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. राज कौशल हे अभिनेत्री मंदिरा बेदी तिचे पती होते. मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज कौशल हे ४९ वर्षा चे होते. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत.

दिग्दर्शक राज कौशल यांना आज पहाटे ४.३० वाजेदरम्यान घरात हृदयविकाराचा झटका आला. घरातील सदस्य त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत देईपर्यंत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत राज कौशल यांचे निधन झाले. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

राज कौशल यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.त्यांनी लिहिले आहे की, "आपण दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांना आज सकाळी गमावले. अतिशय दु:खद. ते 'माय ब्रदर निखिल' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. देश त्यांच्या आत्म्याला शांती देवो."


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.