कोचिंग क्लासेसवरील जाचक अटीमुळे संचालकांत नाराजी...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दि. १४ मार्च २०२० पासून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सर्व कोचिंग क्लासेस बंद केले गेले. त्यामुळे हजारो कोचिंग क्लासेस संचालकांचे जगणे असह्य झाले आहे.

कोचिंग क्लासेसवरील जाचक अटीमुळे संचालकांत नाराजी...

लातूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दि. १४ मार्च २०२० पासून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सर्व कोचिंग क्लासेस बंद केले गेले. त्यामुळे हजारो कोचिंग क्लासेस संचालकांचे जगणे असह्य झाले आहे. राज्यात इयत्ता ९ वी व १२ वीचे सर्व वर्ग सर्व शाळा व कॉलेज दि.२३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पण ९ वी ते १२ वी च्या कोचिंग क्लासेसला शाळा, कॉलेज सोबत परवानगी देण्यात आली नाही. हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल खाजगी कोचिंग क्लासेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१४ जानेवारी २०२१ रोजी खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी Doubt Section म्हणून दिली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील आजही सर्व क्लासेस नियमित सुरु होऊ शकले नाहीत. त्यात सुधारणा करून महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

तसेच दि.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महानगरपालिकेने क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविड-१९ चाचणी करून घेण्याची सक्ती केली आहे. ही गोष्ट आम्हां सर्व क्लासेससाठी अडचणीची आहे व आमच्या अधिकारात येत नाही. त्यामुळी अशी सक्ती क्लासेस संचालकांवर लादू नये, अशी मागणी केली आहे.
एक वर्षापासून कोविड-१९ मुळे क्लासेस बंद आहेत. तेव्हापासून हजारो क्लास संचालकांचे जगण्यासाठी प्रचंड हाल झाले आहेत. क्लास संचालकांना आई-वडिलांचा दवाखाना खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते, क्लास हॉल भाडे, क्लास कर्मचाऱ्यांचे पगार, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा इ. खर्च कसा भागवायचा, त्यासाठी अनेक क्लास संंचालकांनी सोने जमा ठेवी मोडुन , कांही संपत्ती विकुन मागील वर्ष आर्थिक अडचणी भागवल्या पण यापुढे क्लासेस बंद ठेवले तर जगणे अशक्य होईल.

कोविड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळा, कॉलेज बंद केले तरी त्या शिक्षकांच्या पगारी चालू असतात पण क्लास संचालकांनी कसे जगायचे. एक वर्ष तर झाला आहे पुढे आणखीन किती वर्ष कोरोना राहील हे कोणी सांगू शकत नाही. आता दुसरी लाट व नवीन स्ट्रेन आला आहे. आणखीन पुढे हे असेच कुठपर्यंत चालेल कोणालाही सांगता येणार नाही.

सर्व क्षेत्र चालू आहेत त्यामुळे शिक्षण क्षेत्र (खाजगी कोचिंग क्लासेस) बंद न करता कोरोना प्रतिबंध उपाययोजना करून शिक्षण क्षेत्र चालू ठेवावे (खाजगी कोचिंग क्लासेस) अशी विनंती आहे. शिक्षण क्षेत्र बंद ठेवून हे वर्ष तर वाया गेले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पण आपण विचार केला पाहिजे.

कोरोना प्रतिबंधासाठी क्लासेस संचालकांना नियम व अटी लागू करण्यात आल्या ते आमच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हिताचे आहे. परंतु कोचिंग क्लासेस भविष्यात ही बंद करू नये, अशी मागणी कोचिंग क्लासेसच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष (PTA) विकास कदम, जिल्हाध्यक्ष सतिष आकडे,
सल्लागार सतिश नरहरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष सचिन घाळगीर, चंद्रकांत काठेवाड आदिनी केली...

तर सरकारवर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल,मी मागणी करणार-सुधीर मुनगंटीवार
जळगाव मधील घडलेल्या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. राज्यात असंच जर चालू राहिले तर सरकारवर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल त्यासाठी मी मागणी करणार असल्याचा इशारा भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.