दिसायला भयावह तरीही जगातील सर्वात सुंदर मांजर

1 min read

दिसायला भयावह तरीही जगातील सर्वात सुंदर मांजर

या मांजरीची विशेषतः म्हणजे तीच्या शरीरावर एकही केस नाही, ज्यामुळे ती अशी भितीदायक दिसत आहे.

जी मांजर तुम्ही बघत अहात कदाचित ही जगातील सर्वात भयानक मांजर म्हणावी लागेल. असे बरेच लोक असतील जे पहिल्यांदाच या मांजरीला पाहून घाबरले असतील. सहा वर्ष वय  असणारया या मांजरीचे नाव झेरदान आहे. इतकेच नाही तर या मांजरीचे इन्स्टाग्रामवर २२ हजाराहून अधिक फॉलोअर्सही आहेत. स्वित्झर्लंडच्या रूती मध्ये राहणा-या या मांजरीची विशेषतः म्हणजे तीच्या शरीरावर एकही केस नाही, ज्यामुळे ती अशी भितीदायक दिसत आहे. एवढेच नाही तर तीच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की, ती खुपच वयस्कर आहे, कारण तीच्या पुर्ण शरीरावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. त्यामुळे तीला बघताच क्षणी माणसाला भिती वाटते. मांजरीची शिक्षिका म्हणते की, ही जगातील सर्वात सुंदर आणि गोड मांजर आहे.