लॉकडाऊनमध्ये लावला अत्याधुनिक हेल्मेटचा शोध

1 min read

लॉकडाऊनमध्ये लावला अत्याधुनिक हेल्मेटचा शोध

रात्रीच्या वेळी पार्किंगमधील बाईक शोधण्यासाठी वायरलेस हेडलाईट सिस्टम या अत्याधुनिक हेल्मेट मध्ये आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा येथील युवकाने अत्याधुनिक पद्धतीचे हेल्मेट कल्पकतेने आणि मेहनतीने बनवले आहे. या हेल्मेटचा वापर अपघात रोखण्यासाठी आणि गाडीचा वेग कमी जास्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. भोजलींग कुंभार असे या तरुणाचे नाव आहे. तो सांगलीतील खानापूर तालुक्यात राहतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आयटीचे शिक्षण पूर्ण केले. लॉकडाऊनच्या काळात या तरुणाने एका हेल्मेटचे संशोधन केले.

भोजलींग यांनी या हेल्मेटचे पेटेंटही मिळवले आहे. तर परदेशातून या हेल्मेटला खूप मागणी वाढली आहे. पण परिस्थिती नसल्याने प्रॉडक्शन करता येत नाही. भोजलींग याला हे हेल्मेट भारतात द्यायचे आहे. त्यासाठी सरकारने मदत करुन या हेल्मेटचा भारतात फायदा होईल.

अत्याधुनिक हेल्मेटची वैशिष्ट्य :-
1) अपघातावेळी इमर्जेंन्सी काळात ऑटोमॅटिक कॉलचे फंक्शन उपलब्ध.
2) रात्रीच्या वेळी पार्किंगमधील बाईक शोधण्यासाठी वायरलेस हेडलाईट सिस्टम.
3) वायरलेस हॉर्न सिस्टम.
4) गूगल मॅप इनबिल्ट असल्यामुळे प्रवासात वाया जाणार वेळ आणि पेट्रोल वाचेल.
5) इनबिल्ट चाविसाठी कोडिंग हार्डवेयर सिस्टिम असल्यामुळे हेल्मेट असताना बाईकला चावीची गरज भासणार नाही.
6) जर बाईक चालकाने हेल्मेट घातले नाही. तर बाईकला चावी तर लागणारच शिवाय बाईकची स्पीड ही 40kmh पर्यंत मर्यादीत राहील. डॅशबोर्डला ‘please wear helmets You are in risk’ असा मेसेज दाखवेल.
7) हेल्मेट घातले तर बाईकला चावीची गरज भासणार नाही आणि बाइकची स्पीड ही 120Kmh पर्यंत वाढू शकेल आणि डॅशबोर्डवर हिरवा सिग्नल मिळेल. HAPPY Journey दाखवेल.
8)  सर्व सिस्टम सोलार सिस्टमवर चार्ज होते.
9)  इमर्जेंन्सीवेळी हेल्मेटला 9 वाट बल्ब प्रकाश पडेल एवढी लाईट लागते.
10) हेल्मेट मोबाईल फोन चार्जिंगसाठी पावरबँक म्हणून वापरु शकता.
11) प्रवासात मनोरंजन करण्यासाठी म्युझिक सिस्टम, तर वायरलेस इंडिकेटर्स ब्लिंक करतात. 12) वायरलेस ब्रेक लाईट आणि मोबाईल वरचे कॉल हेल्मेटमध्ये रिसिव्ह करता येतात.