राज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन 'या' नावाची चर्चा

काँग्रेसकडून दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता...

राज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन  'या' नावाची चर्चा

मुंबई : काॅग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वच लक्ष लागले आहे. काॅग्रेसकडुन येत्या दोन दिवसांत नावची घोषाणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात रजनी पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे विधान परिषदेत्या राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या १२ जणांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याच काँग्रेसाच एक प्रस्ताव असल्याचंही कळतंय. तर मुकूल वासनिक यांच्या नावाला विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांचाच विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.