जागतिक बॅंकेच्या सल्लागारपदी डिसले गुरुजींची नियुक्ती

जुन 2021 ते जुन 2024 या कालावधीसाठी ही नेमणुक करण्यात आली आहे.

जागतिक बॅंकेच्या सल्लागारपदी डिसले गुरुजींची नियुक्ती

श्रुती बहिरगावकर (मुंबई) - सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील रणजीतसिंह डिसले गुरुजींची जागतिक बॅंकेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी इटलीती विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. त्यानंतर ग्लोबल स्टुडंट प्राईज अॅकॅडमीवरही त्यांची नेमणुक करण्यात आली होती. आता जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातुन त्यांचे कौतुक होत आहे.

जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ग्लोबल टिचर पुरस्कार मिळालेले पहीले भारतीय शिक्षक रणजीतसिंग डिसले यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जुन 2021 ते जुन 2024 या कालावधीसाठी ही नेमणुक करण्यात आली आहे. जगभरातील 12 शिक्षकांची या समितीवर सल्लागारपदी नियुक्ती केली असून त्यात बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातुन तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करुन 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डिसले गुरुजी यांनी सांगितले. जगभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये एकसुत्रता आणणे, कलासुसंगत शिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातुन नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टै ठरवण्यात आली आहेत.

दरम्यान सोलापुरच्या परीतेवाडी शाळेत डिसले शिक्षक आहेत. क्युआर कोड आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, त्यांनी शिक्षणाची नवी पद्धत विकसीत केली आहे. आयटी क्षेत्रात नवे संशोधन करण्यासाठी त्यांनी स्वतःची प्रयाेगशाळाही तयार केली आहे. लॉकडाऊन काळातही त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.