सभापतींच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना किराणा मालाचे किट वाटप

सभापतींच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना किराणा मालाचे किट वाटप

निलंगा : खावटी अनुदान योजना आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद विभाग अंतर्गत तालुक्यातील पन्नास आदिवासी लोकांना पंचायत समिती सभापती राधा बिराजदार यांच्या हस्ते किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.

कोरोना काळात आदिवासी लोकांना हाताला काम नसल्यामुळे गरीब लोकांना ही योजना राज्य शासन व केंद्र शासन यांच्या अंतर्गत सुरू असून निलंगा तालुक्यातील चिचोंडी कोकळगाव चिंचोली भंगार दापका दादगी कासार बालकुंदा जाऊवाडी शेडोळ मुगाव भिल्ल वस्ती निलंगा अशा एकूण ५० आदिवासी लाभार्थ्यांना पंचायत समिती आवारात किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले ही योजना आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असून पुढील पाच टप्प्यात याचे एकून तालुक्यातील पाचशे आदिवासी जमातीला याचा लाभ होणार आहे.या किट मध्ये किराणा माल वाटप झाला असून मटकी, चवळी, हरभरा, वटाना, तूरदाळ, उडीद दाळ, मिठ, गरम मसाला, शेंगदाना तेल, चहा पावडर, साखर, असे स्वरूप आहे.

ज्या लाभार्थ्यांनी आपला अर्ज गावातील ग्रामपंचायत कार्यालयात आॕनलाईन केला आहे.अशा लोकांना याचा लाभ मिळणार आहे.तसेच नगदी स्वरूपात दोन हजार रूपये मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाने जमा केले आहेत.तर उर्वरित लोकांना याचा लाभ लवकरच मिळणार आहे.अशी माहिती निलंगा पंचायत समितीच्या सभापती राधा बिराजदार यानी सांगितले.जास्तीतजास्त अनु.जमातीच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा अशा सुचनाही त्यानी यावेळी केल्या.

यावेळी बालाजी माने सुरेश बिराजदार अधिकारी बाळासाहेब सोनहिवरे मुख्याद्यापक अनुदानीत अश्रमशाळा शिरूरअनंतपाळ दत्तप्रसाद कुलकर्णी सचिन शिंदे सुशेन बिरादार शिवदास जांगटे प्राथमिक मुख्याद्यापक यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.