व्यापारी महासंघाच्या वतीने मास्कचे वाटप.

1 min read

व्यापारी महासंघाच्या वतीने मास्कचे वाटप.

कार्याध्यक्ष बगडिया यांच्या उपस्थितीत उपक्रम

हिंगोली: व्यापारी महासंघाच्या नूतन कार्यकारिणीच्या वतीने आज हिंगोली येथील गांधी चौकात दुपारी कार्याध्यक्ष रमेशचंद्र बगडिया व पपदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मास्क व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तरुण व्यापारी कार्यकर्त्यांनी जनजागृतीसाठी विशेष परिश्रम घेतले.
WhatsApp-Image-2020-10-06-at-1.11.58-PM
नुकतीच जिल्हा व्यापारी महासंघ व हिंगोली शहर व्यापारी महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आज गांधी चौक येथे मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाळाव्या लागणाऱ्या नियम व उपाय योजनांचे माहितीपत्रक देखील देण्यात आले. या कार्यक्रमाला व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष रमेशचन्द्र बगडिया, सचिव प्रकाश सोनी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत गुंडेवार, सुनील मानका, सुधीर आप्पा सराफ, श्यामसुंदर मुंदडा, सुभाष लादनिया यांच्यासह शहराध्यक्ष पंकज अग्रवाल, आनंद निलावार, केशव दुबे, अभयकुमार भरतिया आदि तरुण व्यापाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
नागरिकांनी नियम पाळून काळजी घ्यावी-बगडिया
हिंगोली जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्या पेक्षा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून काळजी घ्यावी. असे आवाहन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष रमेशचंद्र बागडिया यांनी केले आहे.