वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त गणवेश वाटप व वृक्षारोपण

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण

वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त गणवेश वाटप व वृक्षारोपण

सोनपेठः सोनपेठ शहरातील केंद्रीय कन्या शाळा येथे दिवगंत माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक यांच्या जंयती निमित्त प्रतिनीधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व केंद्रीय कन्या शाळा परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण तर प्रमुख पाहुणे मान्यवर शालेेेेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, केंद्रप्रमुख गणपत कोटलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किसन रत्नपारखे, जिल्हा परिषद प्राथमिक मुख्याध्यापक राठोड, परसराम सावंत, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड आदींनी प्रथम.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शौकत पठाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व सर्व प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिनीधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व केंद्रीय कन्या शाळा परीसरात विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी केंद्रीय कन्या शाळेच्या सर्व शिक्षिका सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.