तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी जिल्हास्तरीय वेबिनार संपन्न.

1 min read

तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी जिल्हास्तरीय वेबिनार संपन्न.

उस्मानाबाद जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना आवाहान केले. आपल्या शाळेची सर्व माहिती तंबाखू मुक्त अँप वर अपलोड करावी.आपली शाळा व परिसर तंबाखूमुक्त करावा.

ज्ञानेश्वर परांडे/उस्मानाबाद: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता,पोषक आहार, तणाव निर्मूलन आणि तंबाखूमुक्ती या विषयांवर ऑनलाईन जिल्हास्तरीय प्रशिक्षण शालेय शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लखनगाव आयोजित दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते जि.प उस्मानाबाद यांच्या परवानगीने झूम मिटिंगच्या माध्यमातून तंबाखूमुक्त शाळा करणे. या विषयावर वेबिनार संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमात प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.श्री. रामलिंग काळे , शिक्षणाधिकारी प्राथ. व माध्य.जिल्हा उस्मानाबाद, यांनी 4 फेब्रुवारी 2021 पर्यंत उस्मानाबाद जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना आवाहान केले. आपल्या शाळेची सर्व माहिती तंबाखू मुक्त अँप वर अपलोड करावी.आपली शाळा व परिसर तंबाखूमुक्त करावा. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व जिल्हातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करणार असे मत मांडले. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे प्रतिनिधी आरोग्य अधिकारी डॉ.उस्मान राठोड, यांनी ऐलो लाईन अभियान बद्दल माहिती दिली.यावेळी वेबिनार मध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी, मा.श्री.रामलिंग काळे,उपशिक्षणाधिकारी उध्दव सांगळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग, चे प्रतिनिधी डॉ.उस्मान राठोड,जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,सर्व विस्तार अधिकारी,सर्व केंद्रप्रमुख, जिल्हा स्तरीय तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, तालुका निहाय प्रत्येकी ५ तंत्र सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.
सलाम मुंबई फाऊंडेशन चे जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री.संदेश देवरूखकर यानी अधिकारी वर्ग व पदाधिकारी तसेच शिक्षक वृंद यांना पी.पी.टी. सादरीकरण द्वारे तंबाखू मुक्त शाळा व कोविड मुक्त आरोग्यदायी जीवन तसेच तंबाखु मुक्त शाळेचे 11 निकष व Tobacco Free School App विषयी अद्यावत माहिती देऊन मार्गदर्शन केले.तसेच श्री.स्वामी समर्थ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था औसा, लखनगावचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक राहुल खरात यांनी शिक्षकांना झूम द्वारे जोडण्यासाठी परिश्रम घेतले.