सुमित दंडुके / जालना : जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये, निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी १२६ अधिकारी, ११५० पोलीस कर्मचारी, १ हजार होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. या निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करणार असल्याचेही यावेळी अधीक्षकांनी सांगितले.