सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा

शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा

मुंबई : उद्योगपती मुकेश अबांनी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा (NIA) एनआयएनकडुन अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी अटकपुर्वी तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आ. राम कदम यांनी केली आहे.

आ. राम कदम यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख जी सचिन वाजे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी. असं आ. राम कदम यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकार अशी कोणी नावे आहेत वाचु इच्छित आहे? नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.असं ही आ. कदम यांनी म्हटलं आहे.

‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ’ - सचिन वाझेंच्या
सचिन वाझेंचा व्हाॅट्सऑप स्टेटस जगाला गुड बाय म्हणायांची वेळ आली.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.