डॉक्टराचा हलगर्जीपणा कंपाउडरने दिले रुग्णांला इंजेक्शन

1 min read

डॉक्टराचा हलगर्जीपणा कंपाउडरने दिले रुग्णांला इंजेक्शन

डॉक्टरने हलगर्जीपणा दाखवला. फोवनवरच सुचना देऊन कंपाऊंडरला इंजेक्शन द्यायला लावले. यात16 वर्षीय मुलाचा दोन तासातच मृत्यू झाला डॉक्टर निलंबित करण्यात आला आहे.

वर्धाः सेलू तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेल्या श्रेयस किशोर नवघरे या मुलाची 17 जून रोजी पाहाटे तीन वाजताच्या सुमारास प्रकृती चिंताजनक असल्याने, त्या मुलाला झरशी येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी निवासस्थानी असलेले डॉक्टर रविंद्र देवगडे गैरहजर असल्याने तेथील कार्यरत असलेले आरोग्य सेवक ज्ञानेश्र्वर भगत याने डॉक्टरांना रुग्ण दाखल झाल्याची माहिती दिली. डॉक्टराच्या सांगण्यानुसार तेथील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकाने त्या मुलावर उपचार केला.त्या मुलाचा दोन तासातच मृत्यू झाला. अशी धक्कादायक घटना घडले नंतर डॉक्टराला निलंबित करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आरोग्य सेवकने 16 वर्षीय मुलावर उपचार करिता. त्याला इंजेक्शन देताच केंद्रातून सुट्टी दिली. श्र्वेयस हा त्याचा वडिलांसोबत दोन किलोमीटर अंतरावर जाताच त्याचा दोन तासात मृत्यू झाला. 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या कुटूंबियांनी मुलाचा मृतदेह आरोग्य केंद्रात आणला. आरोग्य केंद्राची तोडफोड करीत बेजबाबदार डॉक्टर रविंद्र देवगडे, आरोग्य सेवक ज्ञानेश्र्वर भगत या दोघांवर कठोर करवाई करण्याची मागणी केली. आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण निर्मान झाले होते.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अजय डवले यांना कळताच त्यांनी घटनेची माहिती घेत तात्काळ डॉक्टर रविंद्र देवगडे यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित केलं. त्यानंतर कुटूंबियांनी मुलाचा मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. पुढील चौकशी सेलू पोलिस करीत आहे.