कुत्र्यांनी केली काळवीटाची शिकार

1 min read

कुत्र्यांनी केली काळवीटाची शिकार

लवकरात लवकर वन विभागाने लक्ष घालून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर: हुलसूर तालुक्यातील आंतरभारतीय तांडा लगत शांतकुमार मुक्ता यांच्या शेतात रात्री कुत्र्यांनी काळवीटाची शिकार केलेली घटना समोर आली आहे. त्यांच्या शेतातील शेत मजूर राजकुमार पवार यांनी ही माहिती दिली.
WhatsApp-Image-2020-10-27-at-12.01.25-PM
या परिसरात हरीण व काळवीटाची संख्या जास्त आहे. अश्या प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात , दि.२५ रोजी रात्री मोठ्या शिंगाच्या काळवीटाची शिकार करून आर्धवट भाग खावून शांतकुमार मुक्ता यांच्या शेतात पडल्याने थोडीशी भिंती वाटत होती. त्यामुळे पोलीसांना माहिती कळवली, त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही. हरीण व काळवीट प्राण्यांमुळे मुळे शेताचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वन विभागाने लक्ष घालून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.