डोकावू थोडे सामान्य ज्ञानापलिकडे...

1 min read

डोकावू थोडे सामान्य ज्ञानापलिकडे...

असेच काही आश्चर्य करणारी गोष्ट

बालवयापासून प्रत्येकानेच सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचली असतील. काहीजण आजही वाचत असतील. कारण त्यामध्ये काही अशा मनोरंजक गोष्टी असतात ज्या वाचून कधी कधी आश्चर्य वाटते. आज असेच काही आश्चर्य करणारी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. एवढेच नाही तर या माहितीचा तुम्हाला भविष्यातही उपयोग होवू शकतो.

बुद्धिबळ, एक विचारमंथन खेळांपैकी एक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये चेस देखील म्हणतात, भारतात याचा शोध लावला गेला होता. मानसशास्त्रज्ञांच्या मते, बुद्धिबळ खेळल्याने मेंदूची मानसिक क्षमता सुधारते आणि अवघड वाटणारे प्रश्न सोडविण्याची क्षणता वाढते.

जगातील सर्वात मोठा पक्षी शहामृग आहे परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की शहामृगाच्या मेंदूपेक्षा त्याचे डोळेच मोठे आहेत. शहामृगाचे डोळे दोन इंच लांब आणि जाड असतात. पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याकडे एवढे मोठे डोळे नाहीत.

डॉल्फिन मासा भारताचा राष्ट्रीय मासा म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की डॉल्फिन फक्त पाच ते आठ मिनिटे त्याचा श्वास रोखून धरु शकतो. होय, हे अगदी खरे आहे. एवढेच नाही तर तो त्याचा एका डोळा उघडा ठेवूनही झोपू शकतो.

सर्वात जास्त दिवस जगणारयांपैकी कासवाची तुलना केली जाते. विशेष म्हणजे कासव हा २०० ते २५० वर्षापर्यंत जीवंत राहणारा प्राणी आहे. ३०० पेक्षा जास्त कासवांची प्रजाती अस्तित्वात आहेत. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कासवांना दात नसतात हे तर तुम्हाला माहितच असेल. प्रत्येक वर्षी २३ मे ला जागतिक कासव दिवस साजरा केला जातो.

कधी विचार केलाय का की, एकाचवेळी आपण दोन वेगवेगळ्या दिशांना बघू शकतो का. नाही बघू शकत ना. परंतु सरडाच एकमेव असा प्राणी जो एकाचवेळी दोन्ही दिशेकडे बघू शकतो. एवढेच नाही तर त्याच्याकडे रंग बदलण्याचेही उत्तम कौशल्य आहे. आणि त्याचे हेच वैशिष्ट्य त्याला इतरांपैक्षा वेगळे ठरवते.