दोन डोकी असलेल्या मलेशियातील माबुल बेटावर जन्माला आलेला हा कासव चर्चेचा विषय ठरला खरा, परंतु आपल्या अशा विचिञ जन्मामुळे त्याला आपले प्राणही गमवावे लागले आहे. येथील सुरक्षा प्रबंधक आणि समुद्र जीव शास्ञज्ञ डेविड मेकेन यांनी सांगितले की, तो दोन डोकी असलेला कासव खुपच आकर्षक होता. तो आपल्या डाव्या बाजूच्या डोक्याने डावा पाय आणि उजव्या बाजूच्या डोक्याने उजवा पाय नियंञित करत असे. अन्य अधिकारयांचे म्हणणे आहे की, येथे तब्बल १३ हजार कासवांनी जन्म घेतला आहे, परंतु प्रथमच असा दोन डोकी असलेला कासव बघायला मिळाला होता.
वन्यप्राणी विभागातील डाकटर सेन नाथन यांनी सांगितले की, या कासवाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु अशा कासवांची जगण्याची शक्यता फारच कमी असते. याआधीही दोन डोकी असणारा असा कासव २०१४ साली जन्माला आला होता परंतु अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच त्याला आपले प्राण गमवावे लागले.