कोरोनाने निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियाना ५० लाखांची मदत.

1 min read

कोरोनाने निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियाना ५० लाखांची मदत.

औरंगाबाद शहराअंतर्गत तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात आली आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद: कोरोना संसर्गाने सगळीकडेच हाहाकार माजविला आहे. यात अनेक योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेसाठी काम करीत आहे. त्याच योध्द्यांचा महत्वाचा भाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. त्यातील अनेकजण बरे झाले. मात्र काहींचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.
WhatsApp-Image-2020-09-26-at-3.45.33-PM
औरंगाबाद शहराअंतर्गत तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात आली आहे.
आज जिन्सी पोलीस ठाण्याचे हवालदार बनसोड यांच्या कुटुंबियाना पोलीस आयुक्त डॉ.नीखील गुप्ता यांच्या हस्ते ५० लाखांची मदत देण्यात आली आहे. यावेळी डीसीपी.खाटमोडे, डॉ.खाडे व मीना मकवाना यांची उपस्थिती होती.