रक्तदान शिबिराला दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

1 min read

रक्तदान शिबिराला दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

38 जणांनी केले रक्तदान

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 38 रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच बळीराम कऱ्हाळे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, कार्याध्यक्ष महेंद्र पुरी, उपसरपंच ज्ञानोबा माऊली, पोलिस पाटील त्रंबक कऱ्हाळे, ग्रामविकास अधिकारी हेलगड, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे, बीट जमादार सुभाष चव्हाण, पत्रकार पांडुरंग कऱ्हाळे, सिद्धार्थ कुऱ्हे, सुभाष माद्रप, शिवाजी कराळे, तुकाराम बाराटे, सुभाष शेळके, आदिंची उपस्थिती होती. या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संकलन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.