संसदेच्या  पावसाळी अधिवेशनाला सुरुवात,कोरोनाबाबत निष्काळजीपणा नको - पंतप्रधान मोदी

1 min read

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात,कोरोनाबाबत निष्काळजीपणा नको - पंतप्रधान मोदी

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशन, अधिवेशनात चर्चेसाठी एकूण 23 विधेयक आणि 11 हे अध्यादेश आहेत. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे.

दिल्लीः कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. या परिस्थितीत सर्वांनी नियमांचे पालन करत काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर जोवर औषध येत नाही, तोवर काही निष्काळजीपणा नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजपासून संसदेच्या  पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आजपासून संसदेच्या  पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. नेमके काय बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे.  राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृह वापरली जाणार आहेत. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयक सादर करणार आहे. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत.

खासदारांनी कर्तव्याचा मार्ग अवलंबला आहे. मी सर्व खासदारांचे आभार मानतो. याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधी आटोपावे लागले होते. यावेळी अधिवेशनात अनेक बदल केले आहेत. मात्र सर्वांनी याचे स्वागत केले आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय होतील, अनेक महत्वाच्या चर्चा होतील. लोकसभेत जितक्या महत्वाच्या चर्चा होतील, त्याचा देशाला फायदा होतो. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु, असंही ते म्हणाले. देशाच्या सीमेवर आपले जवान मोठ्या हिमतीने आपल्यासाठी तैनात आहेत. जवान दुर्गम भागात, पर्वतांवर, बर्फ पडत असताना आपल्या सुरक्षेसाठी विश्वासाने उभे आहेत. विपरित परिस्थितीत ते देशाची सेवा करत आहेत. या सदनात आम्ही सगळे त्या जवानांच्या पाठिशी ताकतीने उभे आहोत, असा संदेश आम्ही देऊ, असे मोदी म्हणाले.