सामान्यांचा रोजगार हिसकाऊ नका- मनविसे

सर्व आस्थापना सुरू ठेवत आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू करण्याची मनसेची मागणी...

सामान्यांचा रोजगार हिसकाऊ नका- मनविसे

सोनपेठ : मागील वर्षभरापासून कोरोना या आजाराने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने त्यांचे सर्व कारभार कोरोनासारख्या भयंकर आजारातही चालू ठेवले आहेत. यात अवैध वाळू उपसा, गर्दी असणाऱ्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असूनही गर्दी कमी होत नाही. असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. तरीही हातावर पोट असणाऱ्या लोकांवर अन्याय का? असा सवाल उपस्थित करत आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू करण्याची मागणी मनविसेचे मुन्ना बिराजदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्ण वाढत असल्याचे कारण देत आपण आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गैर वापर करत जिल्ह्यातील वाहतुक सेवा तसेच अन्य आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश काढलेला आहे. या सेवा बंद ठेवल्याने कोरोना आटोक्यात येईल?अशी कुठलीही शक्यता नसताना आपण ह्या सेवा विनाकारण बंद करत करण्याचा निर्णय घेतला असून.या सेवा बंद केल्याने या सेवांवर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील लाखो लोकांची उपासमार व गैरसोय होत आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याच्या विवंचनेतुन अनेक जणांनी आत्महत्या केलेली आहे. अगोदरच मागील वर्षभर सर्वांचे अतोनात हाल झाले आहेत.तसेच आज महाविद्यालयासह शालेय परिक्षा चालु होणार आहेत. यासाठी इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत येऊन क्लास घेत असताना असे कठोर नियम लावू नयेत असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.जर लॉकडाऊन हाच पर्याय असेल तर अगोदर सर्वांना आर्थिक मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सदर निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे,मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार,शहराध्यक्ष संदिप कांबळे,मनविसे तालुकाउपाध्यक्ष गणेश रोडे,भागवत खरात,पानपट्टी असोसिएशनचे माणिक मोरे,संतोष कलिदंर,सागर डाके, मोतीराम शिंदे,बापु कांबळे,राम कांबळे,कृष्णा माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.