चिंता करू नका लवकर बरे व्हा; आरोपीला कडक शिक्षा करु- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द

चिंता करू नका लवकर बरे व्हा; आरोपीला कडक शिक्षा करु- मुख्यमंत्री

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फोनवरुन चौकशी केली. 'आरोपींना कडक शिक्षा होईल, काळजी करु नका. तुम्ही ठणठणीत बऱ्या व्हा,'अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळेना धीर दिला आहे.

त्या माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता पिंपळे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करु नका अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले. महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता. यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली.

मुख्यमंत्र्यांचा संवाद जशाच्या तसा
“जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तु्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नेमक काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.