दूध दरवाढीसाठी भाजपाचे आंदोलन

जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न

दूध दरवाढीसाठी भाजपाचे आंदोलन

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत असून बँकेकडून नाकारले जाणारे पीककर्ज,सोयाबीन बियाण्यामुळे दुबार पेरणीचे ओढावलेले संकट,युरिया खताच्या तुटवड्यावर मार्ग काढणारा शेतकरी,अनेक प्रश्नाने आर्थिक अडचणीत असून शेतक-यांचे सरकार म्हणवून घेणा-या सरकारला शेतक-याची किव येत नसल्याचा सवाल उपस्थित करत भाजपाने दूध दरवाढ व इतर प्रश्नावर आंदोलन केले .यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतक-यांच्या प्रश्नाव प्रमुख मागण्याचे निवेदन पाठवून शेतक-यांच्या भावना निवेदनातून कळवण्यात आले.यावेळी शेतक-यांचा कळवळा म्हणून घेणा-या सरकारला शेतक-यांची किव येत नसल्याने या सरकारची किव करण्याची वेळ आली असल्याचा घणाघात जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी केला.यावेळी महाराष्ट्रामध्ये एक कोटी ४० लाख लिटर गाईच्या दुधाचे उत्पादन होते.त्यापैकी ३५ लाख सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते तर ९०लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते,पंधरा लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स आणि ग्राहकांना पुरवतो शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दुधाची खरेदी केल्या जाते या कोरोनाच्या लोकडॉउनमुळे दुधाच्या विक्रीमध्ये ३०%घट झाली आहे.शहरातील मुख्य हॉटेल व्यवसायावर संक्रांत ओढावली आहे.या सर्वपार्श्वभूमीवर शेतकरी त्रस्त आहे.या संकटाचा सामना करत असताना मार्ग काढणे गरजेचे आहे.मात्र सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोप भाजपाचे शिवाजीराव मव्हाळे यांनी केला आहे.त्यामुळे शासनाला शेतक-यांची काळजी असावी हा उद्देश या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करत शासनाने गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये लिटरप्रमाणे अनुदान तर दूध पावडरच्या एक किलोला पन्नास रुपये अनुदान देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून कदम व मव्हाळे यांनी संयुक्तरीत्या बोलतांना केली आहे.वरील मागण्या मान्य न झाल्यास एक ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.निवेदनावर प्रमोद वाकोडकर,रमेश गोळेगावकर,रामकिशन रौंदळे,बाळासाहेब भालेराव,संदीप जाधव,बाळासाहेब राजूरकर,भालचंद्र गोरे,राजेश देशमुख,सुरेश भुमरे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.