स्वप्निल कुमावत: राज्यभर शेतकऱ्यांच्या दुधाला 35 रुपये भाव किंवा हमीभाव मिळावा यासाठी भाजपसह शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा दुधाला हमीभाव द्यावा यासाठी मागील काही दिवसापासून राज्यभर शांततेत आंदोलन सुरु होते. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. म्हणून शेतकरी आता रस्त्यावर उतरून करणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉस्क आणि सुरक्षित अंतर राखत आंदोलन सुरु आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करीत आहे. तो दूर झालाच पाहिजे. दूध खरेदी वाढवून सरकारने हा अन्याय दूर करायला पाहिजे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे. प्रस्थापित सरकारला गेल्या अनेक दिवसापासून दूध विक्रेते भाव वाढ मिळावी म्हणून चर्चा करीत होते.परंतु या चर्चेला सरकारने न्याय दिला नाही .यासाठी परत एकदा दूध विक्रेते शेतकऱ्यांनी आंदोलन करून त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दूध दरवाढीसाठी भाजपने आज सकाळी १० वाजता नागपूर मधील कामठी तालुक्यातील अजनी, येथे आंदोलन केले. अजनी येथील दूध डेयरी बंद करून त्यांच्याकडून दूध विकत घेऊन ते दूध गरिबांना मोफत वाटप केले. दुधाला भाव मिळण्यासाठी भाजप चे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुधाला दहा रुपये वाढीव दर द्यावा, दुधाच्या भूकटीला 50 रुपये वाढीव दर देण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरवात झाली आहे. याच आंदोलनावर स्वाभिमानीचे नेत राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांचे हित जोपासत हे आंदोलन करण्यात आले आहे . शेतकऱ्याच्या दुधाला हमीभाव अथवा 35 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत गावागावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेत जनजागृती आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत तोंडाला मास्क लावत दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ द्यावी व दूध संघाने देखील शेतकऱ्यांच्या दुधाचे थकीत बिल बँकेत वर्ग करावे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला.