दोरीने बांधुन कुत्र्याला नेले परफटत, दोघांवर गुन्हा दाखल

1 min read

दोरीने बांधुन कुत्र्याला नेले परफटत, दोघांवर गुन्हा दाखल

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेश

स्वप्निल कुमावत/ औरंगावाद – अजबनगरमध्ये दुचाकीवरुन जाणा-या दोघांनी कुत्र्याला दोरीने बांधून अत्यंत क्रुरपणे फरफटत नेल्याचा 14 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर दोघा आज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला खाण्यासाठी अननसातुन स्फोटक पदार्थ देऊन तिला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत असताना औरंगाबादेत घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. या कृतीमुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेश
हा व्हिडीओ श्र्वानप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटवर टॅग केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले. महासंचालकांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना आदेश दिले.
तुळजापुरमध्ये 15 ते 16 श्र्वानांवर विषप्रयोग करुन त्यांना मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका रुग्णालयासमोर त्यांचे मृतदेह टाकून देण्यात आल्याने शनिवारी रिपाइंने पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.